दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह पाडळसेतील संशयित जाळ्यात ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
Suspects in Padalse with two village pistols and live cartridges in the net; Performance of Bhusawal market police भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस बाळगणार्या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. देवानंद विकास कोळी (20, तुकाराम नगर, पाडळसा, ता.यावल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील पांडुरंग टॉकीजजवळील दगडी पुलाजवळ केटीएमवरून फिरणारा संशयित गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवार, 28 रोजी दुपारी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे 40 हजार रुपये किंमतीचे दोन कट्टे, पाचशे रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस, 25 हजार रुपये किंमतीचा आयफोन व 50 हजार रुपये किंमतीची विना क्रमांकाची केटीएम बाईक मिळून आल्याने एकूण एक लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण, पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, नाईक निलेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली.