मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू


Two died in different incidents in Muktainagar taluka मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली.

इलेक्ट्रीक शॉक लागून तरुणाचा मृत्यू
पहिल्या घटनेत इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून मुक्ताईनगर शहरातील 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शहरातील बोदवड रोडवरील वात्सल्य हॉस्पिटल जवळ घडली. मुक्ताईनगर शहरातील बोदवड रोडवरील वात्सल्य हॉस्पिटलजवळ प्रदीप नाईक यांच्या दुकान बांधकामाच्या ठिकाणी राहुल योगेश माळी (24, जुने गाव, मुक्ताईनगर) हा इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला असता जबर शॉक लागला. राहुल माळी याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गणेश महाजन यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार चव्हाण करीत आहे.



महामार्ग ओलांडताना मृत्यू
दुसर्‍या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील सागर साहेबराव चंदनकर (16, रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) हा चिखली गावासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना मंगळवार. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली. अक्षय चंदनकर यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय रघुनाथ पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !