रावेरात कत्तलीसाठी जाणार्‍या सहा गायीची पोलिसांनी केली सुटका : त्रिकूटाविरोधात गुन्हा


Police rescued six cows going for slaughter in Raver : Crime against the trio रावेर : कत्तलीसाठी जाणार्‍या सहा गायीची पोलिसांनी सुटका केली. गायींना कत्तलीसाठी नेणार्‍या तिघा आरोपींविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर तालुक्यातील अभोडा-रावेर रस्त्याने कत्तलीसाठी गाई घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना सूचना दिली. मंगळवारी तिघे बेकायदेशीररित्या गायी घेऊन जातांना दिसले तर पोलिसांना पाहून संशयीत पळून गेले. पोलिसांनी 57 हजार रुपये किंमतीच्या सहा गायी ताब्यात घेत त्यांची रवानगी गोशाळेत केली. याप्रकरणी अफसर हुसेन कुरेशी, फिरोज रज्जाक कुरेशी, नजीम खा नय्युबख कुरेशी (रसलपूर, ता.रावेर) या तिघांविरुद्ध पोलीस कॉस्टेबल उमेश नरवाडे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विष्णू भील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !