वाळू साठा प्रकरण : भुसावळ डीआरएम यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस


Sand stock issue : Tehsildar issued notice to Bhusawal DRM भुसावळ : भुसावळ तहसीलदारांनी वाळू साठा आढळल्यानंतर उपमुख्य अभियंता निर्माण यांना नोटीस बजावली मात्र नोटीसीला उत्तर न आल्याने तहसीलदार निता लबडे यांनी थेट मध्य रेल्वेच्या डीआरएम यांना कारणे दाखवा नोटीस काढल्याने प्रशासनाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कारवाईकडे लागले लक्ष
रेल्वेच्या परिसरात 9 फेब्रुवारीला 98 ब्रॉस वाळू व 60 ब्रॉस मुरूम मिळून आल्यानंतर तहसीलदारांनी पावत्या तहसील कार्यालयात सादर करण्याबाबत नोटीसीने बजावले होते. रेल्वे प्रशासनाने वाळू व मुरूम कोठून आणले याच्या पावत्या दाखवाव्यात याची मागणी तहसीलदार यांनी केली. एक आठवडा उलटूनही नोटीसीला उत्तर न आल्याने तहसीलदार निता लबडे यांनी थेट डीआरएम ईती पांडे यांना पावत्या दाखविण्यासाटी नोटीस 26 फेब्रुवारीला काढली आहे. रेल्वे प्रशासन या नोटीसीला काय उत्तर देते व पुढे काय कारवाई होते ? याकडे सुज्ञ भुसावळकरांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !