इंग्रजीच्या पेपराला सर्रास कॉपी : यावल तालुक्यात पाच विद्यार्थ्यांवर कारवाई
यावल : बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपराला कॉपी करणार्या पाच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी तालुक्यातील काही केंद्राना मंगळवारी भेटी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यात सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील ज्योती विद्या मंदिरात एका विद्यार्थ्याला डीबार करण्यात आले आहे तसेच यावल येथील महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरील चार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुर्व भागाचे कस्टडीयन तथा गटशिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी पत्रकारांना दिली.
मंगळवारपासून परीक्षेला सुरुवात
तालुक्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातुन ठरवुन दिलेल्या परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. मंगळवारी तालुक्यातील पूर्व भागात दोन हजार 377 तर पश्चिम भागातून दोन हजार 454 असे चार हजार आठशे 31 विद्यार्थ्यांनी मंगळवारी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली असल्याची माहिती पुर्व विभागाचे केंद्र प्रमुख व गटशिक्षण अधिकारी एजाज शेख व पश्चिम विभागाचे कस्टोडीयन सौमित्र अहिरे यांनी दिली.



