भुसावळात संविधान बचावो समितीतर्फे अर्धनग्न आंदोलन


तहसीलदार प्रशासनाला मागण्यांचे निवेदन : 31 व्या दिवशी शासनाचा निषेध

भुसावळ : सीएए रद्द करण्यासह एनपीआर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी भुसावळ संविधान बचावो समितीतर्फे गेल्या 31 दिवसांपासून भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणाच्या 31 व्या दिवशी आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आजच्या दिवशी 1911 मध्ये प्रथमच राष्ट्रगीत म्हटले गेल्याने आंदोलनस्थळी राष्ट्रगीतही म्हणण्यात आले. याप्रसंगी मागण्यांबाबत तहसीलदार प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत डोक्याला काळ्या रंगाची रीजेक्ट सीएए, बॉयकॉट एनआरसी आशय लिहिलेला मजकूर असलेली पट्टी बांधत शासनाचा जोरदार शब्दात निषेध केला. या आंदोलनात साबीर शेख यांच्यासह सलीमसेट चुडीवाले, अशरफ कुरेशी, यूनुस मामा, अजहर शेख, वासीफ सैयद, मोहम्मद आबीद, इम्रान खान, फरान भाई, डॉ.इमरान शेख, फरीद सलीम खान, लियाकत अली, भगवान मेढे, ठेकेदार दानिश पटेल, जुनेद खान, मोहसीन शेरू बिल्डर आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !