पाडळसरे येथे धाडसी घरफोडी : 87 हजारांचा मुद्देमाल लंपास


Daring house burglary in Padalsare : Goods worth 87 thousand looted अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्याचे दागिने व 27 हजारांची रोकड मिळून 87 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
जुगल राजेंद्र पाटील (36, रा.पाडळसरे, ता.अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता ते घर बंद करून अमळनेर येथे कामाच्या निमित्ताने गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि 27 हजारांची रोकड असा एकूण 87 हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीचा प्रकार दुसर्‍या दिवशी रविवार, 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी मारवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे..




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !