जळगावात दुचाकी चोरी : पप्पूसह मेरा भाई गुन्हे शाखेच्या ताब्यात
Two-wheeler theft in Jalgaon : Meri Bhai with Pappu in custody of Crime Branch जळगाव : साथीदाराच्या मदतीने दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीवरुन मेरा भाई उर्फ राहुल रवींद्र कोळी (22, रा.मेस्कोमाता नगर, जळगाव) त्याचा साथीदार पप्पु उर्फ राहुल रामदास कोळी (28, रा.मेस्कोमातानगर, जळगाव) यांना अटक करीत दुचाकी जप्त केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मेस्कोमाता नगरातील राहुल कोळी या नावाच्या दोघांनी दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करुन कारवाईकामी त्यांनी पथक रवाना केले. पथकाने मेस्को माता नगर येथे तपासचक्रे फिरवून राहुल कोळी नावाचे इसमाचा शोध घेतला असता मेरा भाई उर्फ राहुल रवींद्र कोळी व पप्पू उर्फ राहुल रामदास कोळी अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर मेरा भाई याला पथकाने ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.19 डी.एच.7789) हा क्रमांक चुकीचा असल्याची कबुली दिली. ही दुचाकी चोरी त्याचा साथीदार पप्पू उर्फ राहुल कोळी अशा दोघांनी केल्याची माहिती दिली. पथकाने पप्पु उर्फ राहुल कोळी यालाही ताब्यात घेतले. दोघे संशयितांसह दुचाकी पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले.


यांनी केली कारवाई
एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीप उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हवालदार महेश महाजन, नंदलाल पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील, बबन पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी ही कारवाई केली.