धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने बांभोरीतील गुराख्याचा मृत्यू


A cowherd in Bambori died after being hit by a running train धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्द गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरूवार, 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डोंगरु दलपत सपकाळे (65, रा.बांभोरी, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.

रेल्वेच्या धडकेने जागीच झाला मृत्यू
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे डोंगरु सपकाळे हे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे बुधवार, 3 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ते त्यांच्याजवळ असलेल्या बकर्‍या चरण्यासाठी रेल्वे रुळाजवळील परिसरात घेवून गेले. सायंकाळी अंधार पडण्यास सुरुवात झाल्यानंतर डोंगरू सपकाळे हे चरत असलेल्या बकर्‍यांना एकत्रित करुन त्यांना घरी जाण्यासाठी निघाले. परंतु सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भरधाव येणार्‍या रेल्वेची धडक बसली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.

रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या डोंगरू सपकाळे यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी त्यांनी डोंगरु सपकाळे यांची ओळख पटवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विरेंद्र शिंदे व सिद्धेश्वर लटपटे हे करीत आहे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !