नागपूरनजीक ढाबा चालकाची हत्या
नागपूर : वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल (53) यांची सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी हत्त्या केली. वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल यांचा नागपूर-जबलपूर महामार्गावर ढाबा आहे. प्रकाश नेहमीप्रमाणे रात्री ढाब्यावर आल्यानंतर पहाटे चार ते पाच चे दरम्यान एका इसमाने त्यांची हत्या करीत पळ काढला. यावेळी ढाब्यावर प्रकाश व्यतिरीक्त दोन नोकर व नजीकच्या वीटभट्यावर काम करण्याकरीता असलेले दोन ते तीन मजूर होते. प्रकाशच्या गालावर मोठी जखम आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.


