यावल पोलिसांकडून दुचाकी चोरटा जाळ्यात : दोन दुचाकी जप्त
यावल : तालुक्यातील दहिगाव सावखेडासीम येथील एका दुचाकी चोरट्यास यावल पोलिसांनी अटक करीत त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जावेद संजु तडवी (22, दहिगाव) यास अटक करण्यात आली. आरोपी विरावली रस्त्यावरून दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.जी.2206) ने जात असताना उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व पोलिस कर्मचारी ढाकणे यांनी त्यास अडवून दुचाकीबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास अटक केल्यानंतर आरोपी निंभोरा, ता.रावेर पोलिस ठाण्याच्या परीसरातून चोरीला गेलेली दुचाकी काढून दिली तसेच अन्य एक चोरीची दुचाकीही काढून दिली. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


