खासदार रक्षाताई खडसेंच्या प्रचारार्थ भुसावळातील प्रभाग 21 मध्ये उद्या प्रचार दौरा


भुसावळ : भारतीय जनता पार्टी महायुतीतील रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता भुसावळ तालुक्याचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.

पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन
प्रचारात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, बुथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.


उद्या सकाळी आठ वाजता प्रचार दौरा सुरू होणार
भुसावळातील प्रभाग क्रमांक 21 मधीलरानातला महादेव, हुडको कॉलनीपासून मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रचार दौर्‍याला सुरूवात होणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !