खासदार रक्षा खडसे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार : मलकापूरच्या सभेत महामार्गा मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास


मलकापूर : रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे हे लोकसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. जी.व्ही.महाजन विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रसंगी उपस्थित होते.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये *रावेर लोकसभेतील भाजपाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर शहरात शुक्रवारी जाहीर सभा झाली. मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडून मतदारांना संबोधून विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी आपण सर्वांनी येत्या 13 मे रोजी भाजपाला मतदानाचे आवाहन केले. खासदार रक्षाताई यांनी दहा वर्षात मोठी विकासकामे केल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !