शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारूचे 600 लीटर रसायन नष्ट
भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलिस कर्मचार्यांसह शुक्रवारी सायंकाळी 600 लिटर गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट केले. बिरूबाई शेकू गवळी या महिलेच्या घराजवळ ही कारवाई झाली. पोलिस निरीक्षक कुंभार यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विठ्ठल फुसे, नितीन सपकाळे, हवालदार संगीता निळे, रियाजुद्दीन काझी यांनी ही कारवाई केली.संशयित महिला पसार झाली. सुमारे 18 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच नष्ट केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गवळी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


