सावदा येथे मतदानाची जय्यत तयारी : 23 बुथवर सुमारे 120 कर्मचारी


Successful preparations for polling at Savada : Around 120 staff at 23 booths सावदा : सावदा येथे प्रशासनातर्फे मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सावदा शहरात सुमारे 23 बूथ असून येथे सुमारे 19 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क सोमवार, 13 रोजी बजावणार आहेत. यासाठी येथे सुमारे 120 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यादृष्टीने प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. सावदा शहरात आठ ठिकाणी 23 बुथवर हे मतदान होईल. मतदानाचा टक्का वाढावा म्हणूनदेखील प्रशासन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सोयी करण्यात आल्या आहेत. यात मंडप टाकण्यात आले असून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

दिव्यांगााठी रॅम्पची सुविधा
दिव्यांग व वृद्ध मतदारांनासाठी केंद्रावर चढण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आले आहे तसेच सावदा शहर केळीसाठी प्रसिद्ध असल्याने येथे आ.गं.हायस्कूलधील मतदान केंद्रावर खास केळीची सजावट करून केळी विषयक थीम तयार करण्यात आली आहे. मतदान सुव्यवस्थित व्हावे म्हणून येथील मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, मुख्याधिकारी भूषण वर्मा, तलाठी तडवी, नगरपालिकेचे अभियंता जितेश पाटील यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहे. सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !