जळगाव व रावेर लोकसभेसाठी दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्के मतदान
जळगाव : जळगाववसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी निवडणूक होत असून आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी आहे तर काही मतदान केंद्रावर मात्र संथगतीने मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी एक पर्यंत जळगाव लोकसभेसाठी 31.70 तर रावेरसाठी 32.02 टक्के मतदान झाले.
जळगाव लोकसभेसाठी 31.70 टक्के मतदान
जळगाव लोकसभेसाठी सकाळी साते ते दुपारी एक दरम्यान 31.70 टक्के मतदान झाले. त्यात-
जळगाव विधानसभा मतदारसंघ- 32.22 %
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 34.93 %
अमळनेर विधानसभा मतदारसंघ- 31.62 %
एरंडोल विधानसभा मतदारसंघ- 35.05 %
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ- 26.97 %
पाचोरा विधानसभा मतदारसंघ- 30.16

रावेर लोकसभा मतदारसंघ- 32.02 %
चोपडा विधानसभा मतदारसंघ- 35.23
रावेर विधानसभा मतदारसंघ- 31.29 %
भुसावळ विधानसभा मतदारसंघ- 31.84 %
जामनेर विधानसभा मतदारसंघ- 29.56 %
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ -30.60 %
मलकापुर विधानसभा मतदारसंघ- 33.65 %

अनेक मतदान केंद्रावर रांगा
जळगाव लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात रावेर व जळगाव लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजेपासून सुरू झाली. अकरा वाजेपर्यंतच्या वेळेत सर्वाधिक मतदान हे रावेर लोकसभेत 19.3 झालेले असून जळगाव लोकसभेत 16.89 टक्के झाले होते. यामध्ये रावेर लोकसभेतील भुसावळ 18.63 चोपडा 20.95 जामनेर 15.87 मलकापूर 20.85 मुक्ताईनगर 17.60 रावेर 20.50टक्के मतदान झालेले आहेत. रावेर लोकसभेमध्ये सर्वाधिक कमी मतदान हे पालकमंत्री व राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 15.87 टक्के अकरा वाजेपर्यंत झाले होते.




