खासदार रक्षा खडसे यांनी वाढदिवसानंतर बजावला मतदानाचा हक्क
जळगाव : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा सोमवार, 13 मे रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी आपल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीतील निवासस्थानी सासरे एकनाथराव खडसे व सासू मंदाताई खडसे यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचे आशीर्वाद घेतले व नंतर मतदानही केले.
परिवाराने एकत्रीत बजावला हक्क
चौथ्या टप्प्यातील लोकसभेसाठी सोमवारी निवडणूक होत असून नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. भाजपच्या रावेर लोकसभेच्या खासदार व उमेदवार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीत सकाळीच वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. सासरे एकनाथराव खडसे यांनी रक्षा यांना केक भरवत सुनबाई रक्षा खडसे यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. मंदाताई खडसे यांनी सुद्धा आशीर्वाद देऊन सर्व परिवाराने एकत्रीत मतदानाचा हक्क बजावला आहे.





