जामनेरात मामाच्या मुलीशी लग्न करण्यावरून दोघा भावांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ; तरुणीचे उत्तर ऐकून भावंड निरुत्तर


Free style fight between two brothers over marrying uncle’s daughter in Jamner ; After hearing the young woman’s answer, the siblings did not respond जामनेर : विवाह इच्छुक तरुणांपुढे समाजात मुली नसल्याची बाब तशी चिंताजनक विषय मात्र नात्यातील मामाची मुलगी असल्याने परराज्यातील बहिण आपल्या दोन मुलांसह जामनेरात आली. मामाची मुलगी पसंत पडल्याने मोठ्या भावाने होकार दिला मात्र याचवेळी लहान भावालादेखील मामाची मुलगी भावली. याच कारणावरून दोघा भावांमध्ये पाहता-पाहता वाद वाढला. हा वाद इतका टोकाला गेला की मुद्याची गोष्ट गुद्यावर गेली. हाणामारीचा विषय पोलीस ठाण्यापर्यंत गेला मात्र त्यातही नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर तक्रार टळली मात्र मुलीने दोघा भावांचा पवित्रा पाहिल्यानंतर तरुणीने लग्नास इच्छूक नसल्याचे सांगत गावातील तरुणाशी प्रेम असल्याचे सांगून लग्नाला नकार दिला व दोघा भावांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.

भावांमधील हाणामारी ठरली चर्चेचा विषय
बाहेरच्या राज्यातील रहिवासी असलेली बहीण शनिवारी जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली.

इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला. दोन्ही भावांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांनाच धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहिण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे परतली. याबाबतचे वृत्त एका मराठी पोर्टलने दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !