पाल वनोद्यानातील पुरातन नागझिरी कुंडाची साफसफाई

श्रमदानातून केले पुरातन नागझिरी जलकुंड गाळ मुक्त : वनविभागाचा अभिनव उपक्रम


रावेर : पाल वनोद्यानातील पुरातन नागझिरी कुंडाची नुकतीच स्वच्छता करण्यात आले. प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, संवस यावल प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजय बावणे आणि वन कर्मचारी यांनी श्रमदानातून केले पुरातन नागझिरी जल कुंडाची साफसफाई करून कुंड गाळ मुक्त केला. भारत हा निसर्ग संपन्न देश आहे. पाणी आणि जलसस्कृंती फार पूर्वीपासून इथला समाज जपत आला आहे. आजवर पाण्याचे नियोजन, संवर्धन व व्यवस्थापन करण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. पाल सुकी नदी किनारी 700 वर्ष पूरातन नागझिरी कुंडाच्या गौमूखातून शेकडो गावकर्‍यांनी आपली तहान भागवली.

निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार
या ठिकाणी भूमीत आढळणारे थंड पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती 700 वर्षांपूर्वी झाली. पूर्वी सकाळी या नागझिरी कुंडातून परिसरातील महिला पाणी भरत असल्याची माहिती गावकरी देतात. कुंडाचे वैशिष्ट्य असे की, एका बाजूस उतरती फरसबंदी असे व आतील बांधकाम पक्के करीत. अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून वर वनस्पतीचा दाट थर देत व कोठेही पाणी मुरणार नाही, याची काळजी घेत वरच्या गौमूखातून सांडपाणी खालच्या डोहात सोडण्याची व्यवस्था असे आणि मग हे सांडपाणी बंदिस्त गटारातून सूकी नदीत सोडण्याची व्यवस्था त्या काळी करण्यात आली होती. यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होणे अथवा पाप नष्ट होते, अशी लोकांची श्रद्धा होती. सुमारे सातशे वर्षांपूर्वी या स्थळी मंदिराची उभारणी झाल्याचे दिसते. या कुंडाजवळ किल्ला, हनूमान मंदिर, हत्तीवाडा, शिवमंदिर, जामा मशीद, राणी महल असल्याने त्या काळी अनेकांची तहान भागवणार्‍या कुंडाचे अस्तित्व आज धोक्यात आले होते मात्र गाळ स्वच्छतेमुळे कुंडाला नवसंजीवनी मिळाली आहे.


यांनी घेतले परिश्रम
मागील तीन वर्षांपासून नागझिरी कुंड आटले आहे. ही बाब लक्षात घेऊन रविवार, 19 रोजी प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, संवस यावल प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या आदेशान्वये वनपाल अरुणा ढेपले, दीपक रायसिंग, वनरक्षक मुकेश तडवी, संजय राजपुत, लेदा बारेला, राजु बोंडल, युवराज मराठे व अधि.वनमजुर मयबु तडवी, शेख वजीर अब्दुल, नवाज तडवी, सुभान तडवी, दिडका बारेला, हुसेन तडवी, सबाज तडवी, संजु तडवी, गोटूराम बारेला, प्यारसिंग बारेला, जावेद तडवी, संजय पवार, युनूस तडवी, अल्लाबक्ष तडवी, अरमान तडवी, बाळु राठोड, रुस्तम तडवी, गुलशेर तडवी, हमीद तडवी, राजु तडवी, उघडू तडवी, भुरेखा तडवी या वनकर्मचार्‍यांनी पाल वनउद्यान येथील पुरातन नागझिरी जल कुडांत साचलेला गाळ हा क्षमदानातून काढून नागझिरी जल कुंड हे स्वच्छ केले. या कुंडातून गाळ निघाल्याने पावसाळ्यात 21 गौमुखातून पाणी पिण्याची व्यवस्था होईल.

नैसर्गिक पाणवठे जिवीत करणार आहेत
यावल वनविभाग अंतर्गत वनपरिक्षेत्रामध्ये जुने नैसर्गिक पाणवठे जलकुंड पुर्ण जीवीत करण्याचे कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून पाल वनोद्यान रावेर वनक्षेत्रातील पाल वनोद्यानातील 700 वर्ष जुने नैसर्गिक नागझिरी जलकुंभचे स्वच्छता व गाळ काढून त्याला पुर्ण जीवीत करण्याचे उद्देशाने रावेर येथील वनकर्मचारी यांनी क्षमदानातून काम केले, असे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !