पाच हजारांची लाच भोवली : पिंप्राळा मंडळाधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 5000 : Pimprala Collector in Jalgaon ACB’s net जळगाव : सातबारा उतार्यावरील मयताचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना पिंप्राळा मंडळाधिकारी किरण खंडु बाविस्कर (47) यास जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
सावखेडा, जि.जळगाव येथील 26 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे नाव सातबारा उतार्यावर लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा तलाठी कार्यालयात 16 मे रोजी अर्ज केला होता व 20 मे रोजी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता आरोपी किरण बाविस्कर यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर त्यात पाच हजार रुपये लाच मागणी झाल्याचे सिद्ध झाले व लाच रक्कम देण्याचे निश्चित केल्यानंतर गुरुवार, 6 जून रोजी सापळा लावण्यात आला. लाच स्वीकारताच मंडळाधिकारी अटक करण्यात आली. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, फौजदार सुरेश पाटील फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने तसेच हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे आदींनी सापळा यशस्वी कलेा.
