जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षकपदी बबन आव्हाड
Baban Awhad as inspector in charge of crime branch जळगाव : जळगाव पोलीस दलातील हेवीवेट मानल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षकपदी बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसनराव नजन-पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर काही दिवसांपासून पद रिक्त असल्याने एमआयडीसी निरीक्षक आव्हाड यांच्याकडे गुन्हे शाखेचा अतिरीक्त पदभार सोपवण्यात आला आहे. गुरुवार, 13 रोजी आव्हाड यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
गुन्हे शाखेचा अतिरीक्त पदभार
ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये बुधवारी करण्यात आली. एलसीबीच्या निरीक्षकपदी जळगाव जिल्ह्यातील चार अधिकार्यांची नावे चर्चेत होती मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एलसीबीसह त्यांच्याकडे एमआयडीसीचा देखील तात्पुरता पदभार असून आचारसंहिता संपताच आव्हाड यांच्याकडेच एलसीबी धूरा असेल, अशी शक्यता आहे.

