तलवार बाळगून दहशत : आरोपीला एमआयडीसी पोलिसांकडून अटक
जळगाव : तलवार बाळगून दहशत निर्माण करताना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयीताला मेहरूण शिवारातून अटक केली. फैजल शेख कदीर (रा.मास्टर कॉलनी, मेहरुण परिसर, जळगाव) असे संशयीतोच नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
फैजल शेख कदीर हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन तांबापुरा परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळताच त्यांनी पथकाला कळवले. पथकाने फैजल यास ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, चंद्रकात पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर आदींनी ही कारवाई केली.
