आसोद्यात शस्त्राच्या धाकावर लूट : त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Robbery  in Asoda : Trio in Crime Branch’s net जळगाव : आसोद्यात शस्त्र दाखवून लूटमार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. जळगाव गुन्हे शाखेने पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या भामट्यांना अटक केली आहे. वैभव विजय सपकाळे, कल्पेश निलेश इंगळे, दिपक धनराज सपकाळे (सर्व रा.आसोदा, ता.जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

असे आहे लूट प्रकरण
शुक्रवार, 14 जून 2024 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अटकेतील तिघा संशयीतांनी संगनमताने शस्त्राचा धाक दाखवून आसोदा येथे एकाच्या शर्टाच्या खिशातून बळजबरीने रोख रक्कम लुटून पलायन केले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश मेढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, चालक भारत पाटील आदींनी संशयीतांच्या मुसक्या बांधल्या.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !