चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : दोन पिस्टलासह अहमदनगर जिल्ह्यातील दोघे जाळ्यात
Major action of Chopra Rural Police: Two arrested in Ahmednagar district with two pistols चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील दोघा तरुणांना दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूसांसह पकडले आहे. संशयीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अहमदनगर जिल्ह्यातील जामवाडी (ता.जामखेड) येथील तुषार हनुमंत पवार (20) व भरत सुखदेव जायगुळे (22) या दोघांना वैजापूर गावाजवळ बोरअजंटीकडे जाणार्या रस्त्यावर दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह पकडण्यात आले. संशयीतांकडील दोन मोबाईल, दुचाकी असा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पल्लवी वाणी करीत आहे. संशयीतांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे समजते.

