एपीजेकेवायएसच्या चेअरमनपदी शिक्षक सुनील वानखेडे


वरणगाव : वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील वानखेडे यांची एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टच्या चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडियाच्या वतीने देशभरात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित या विषयावर जनजागृती करण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जावा तसेच गणित विषय सोपा आहे यासाठी विविध कार्यशाळा व सेंटर सुरू करण्यात आले. आज रोजी 26 राज्य मध्ये काम सुरू आहे.

या माध्यमातून सुनील वानखेडे यांनी व्हाईस चेअरमन असताना विविध कार्यक्रम राबवल्याने नुकतीच अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते त्यांची पदोन्नती करून चेअरमनपद सोपवण्यात आले. या निवडीबद्दल त्यांना रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी यांनी कळविले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !