खुनातील आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक ; पोलीस निरीक्षकांसह नऊ कर्मचारी जखमी !

लाठीचार्ज करून जमाव पांगवला ; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या


Demands for the custody of the accused in the murder : Stone pelting storm on Jamner police station ; Nine employees including police inspector injured! जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करून जामनेर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी करत जमावाने थेट पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. ही घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जमावाने टायरची यावेळी जाळपोळ करीत तुफान दगडफेक केल्याने या घटनेत पोलिस नऊ निरीक्षक किरण शिंदेंसह नऊ कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी हल्ला करणार्‍या 10 ते 12 जणांना रात्रीच ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी फोडल्या अश्रूधूरांच्या कांड्या
संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

निरीक्षकासह नऊ कर्मचारी जखमी
दगडफेकमुळे ठिकठिकाणी दगडांचा खच पडला होता. तर जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातून पोलिस कुमक मागवण्यात आली होती.

अडीच तास वाहतूक रोखली
आक्रमक जमावाने पाचोरा, बोदवड व जळगाव रोडवर रास्तारोको केला. यात पाचोरा उपविभागाचे डीवायएसपी धनंजय वेरुळे यांचे वाहन काही वेळ रोखून धरले, तसेच जळगाव, भुसावळ रस्त्यावरील वाहतूकही अडीच तास रोखली. अचानक झालेल्या प्रकारामुळे शहरातील व मुख्य भागात धावपळ उडाली. त्यानंतर दुकानेही बंद झाली होती. साधारण आठ वाजेला दगडफेक सुरू झाली. यात जमावाने काही मोटरसायकलींची तोडफोड केली तर एक मोटरसायकल जाळून टाकली व टायर पेटवले. सुमारे 15 ते 20 मिनिटे धुडगुस घातला. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी काही सहकार्‍यांच्या मदतीने जमावावर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने प्रतिहल्ला केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !