जामनेर तालुक्यातील अल्पवयीन बालिकेची हत्या : नराधम आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी


जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला भुसावळ बाजारपेठ अटक केल्यानंतर त्यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयीताला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुभाष उमाजी भिल्ल (35) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला.

आरोपीला ताब्यात देण्यासाठी पोलीस ठाण्यावर हल्ला
जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी सुभाष भिल्ल यास भुसावळ येथून अटक करून आणल्यानंतर जामनेरात आणण्यात आले व आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. जमावाच्या दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली तसेच पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली व अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !