सावखेड्यातील घरफोडीची उकल : संशयीत जळगाव एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे घरफोडी करणार्या संशयीताला अटक केली आहे. संशयीताला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. किरण तुकाराम बारेला (सोलंकी, 27, मूळ रा.दुदखेडा, ता.सेंधवा, जि.बडवानी, हल्ली मु.टाकळी प्र.दे., ता.चाळीसगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीची उकल
सावखेडा, ता.अमळनेर येथे पाच महिन्यांपूर्वी घरफोडी झाली होती. या घरफोडीतील संशयित आरोपी हा पसार होता. एलसीबीच्या पथकाला आरोपीची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. दे. येथून आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, चालक मोतीलाल चौधरी आदींनी केली आहे.
