पोलीस होण्याचे स्वप्न भंगले : अमळनेरच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू


अमळनेर : पोलीस दलात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत भरतीसाठी गेलेल्या अमळनेरच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 29 रोजी दुपारच्या सुमारास घडली. अक्षय मिलिंद बिर्‍हाडे (वय 22) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

अचानक कोसळला अन् ओढवला मृत्यू
मुंबईत बाडेगाव येथे पोलीस भरतीसाठी अक्षय गेल्यानंतर मैदानी चाचणीसाठी पाच किमी धावावे लागणार असल्याने तो मैदानात उतरला. मोठ्या जिद्दीने धावू लागला मात्र साडेचार किमी अंतर धावल्यानंतर अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने उचलून कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन तासांनी तो शुद्धीवर ही येऊन त्याला बरेही वाटू लागले मात्र पुन्हा त्याला हृदय विकाराच्या जोरदार झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली.

अमळनेरात शोककळा
मुंबईत शवविच्छेदन करून रविवारी सकाळी मृतदेह अमळनेर येथे आणण्यात येणार आहे. मयत तरुणाच्या पश्चात पश्चात आई-वडील, एक बहिण, काका असा परिवार आहे. मिलिंद बिर्‍हाडे यांचा तो मुलगा तर नगरपालिका अग्निशमन विभागाचे फायरमन दिनेश बिर्‍हाडे यांचा तो पुतण्या होता. एकूलत्या एक मुलाच्या निधनाने कुटूंबावर आघात कोसळला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !