धावत्या रेल्वेखाली अनोळखी तरुणाचा मृत्यू


जळगाव : धावत्या रेल्वेखाली पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात खंबा नंबर 419/ 1026 अप लूप ब्रीज जवळ रेल्वेलाईनवर ही घटना सोमवार, 1 रोजी मध्यरात्रीनंतर घडली.

स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव यांनी खबर दिल्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !