दरोड्यातील टीप देणारा संशयित गजाआड
जळगाव : दरोड्यातील माहिती ( टीप) देणार्या संशयिताला गोपनीय माहितीवरुन एलसीबीच्या टीमने पारोळा येथुन ताब्यात घेतले. गोविंद तुकाराम आर्य (रा. चाटली. ता. निवाली, म.प्र.) असे संशयिताचे नाव आहे. तो पारोळा येथील ओम नम शिवाय जिनिंगमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पथकाने त्याला अटक करुन जामनेर पोलिसांच्या स्वाधीन केले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सुचनेनुसार ही कारवाई एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी, हेमंत पाटील, राहुल बैसाणे यांनी ही कारवाई केली.

