वरणगावात मधमाशांच्या हल्ल्याने वर्‍हाडींची पळापळ


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे अनावश्यक खर्चाला फाटा देत मराठा समाजाच्या साखरपुड्यात विवाहाच्या कार्यक्रमात ऐनवेळी मधमाशांचे मोहोळ उठल्याने 20 ते 25 वर्‍हाडी जखमी झाल्याचे घटना बुधवारी घडली. जीव वाचवण्यासाठी वर्‍हाडींची प्रचंड दाणाफाण झाली. जखमींवर वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आदर्श विवाहात मधमाशांनी घातला खोडा
भुसावळ येथील स्व.गोकुळ नामदेव पाटील यांची कन्या व व अनिल पाटील यांची पुतणी प्रीतीच्या साखरपुडयासाठी तळवेलला बुधवारी आप्तेष्ट आले होते मात्र अनावश्यक खर्चाला फाटा ते साखरपुड्यातच विवाह करण्याचे ठरल्यानंतर वरणगावच्या नागेश्‍वर मंदिरावर साध्या पद्धत्तीने विवाह करण्यो ठरल्यानंतर मधमाशांचे आगेमोहोळ उठल्याने वर्‍हाडींची पळापळ झाली. तालुक्यातील तळवेल येथील संजय नारायण कापसे यांचा मुलगा तुषार (23) याचा भुसावळातील स्व.गोकुळ नामदेव पाटील यांची मुलगी व अनिल नामदेव पाटील यांची पुतणी प्रीती (19) हिच्याशी बुधवारी विवाह पार पडला. वरणगाव येथील नागेश्वर मंदिरावर विवाह असल्याने दोन्ही बाजूकडील सुमारे 400 वर्‍हाडी उपस्थित होते मात्र आगेमोहोळ उठल्यानंतर मंगल कार्यालयात एकच धावपळ उडाली. प्रत्येक जण मधमाशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागा मिळेल तेथे पळताना दिसले तर या घटनेत 20 ते 25 महिला पुरुष व बालकांना दुखापती झाल्या. त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यांनी दिले वधू-वरांना आशीर्वाद
लग्नप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, उपतालुका प्रमुख विलास चौधरी, शिवसेना तालुका उप संघटक प्रकाश कोळी, शिवसेना गण प्रमुख किशोर कोळी, तळवेल उपसरपंच उल्हास भारसके यांनी वधू-वरांचे अभिनंदन करीत त्यांना आशीर्वाद दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !