धरणगाव शहरात सव्वा लाखांची धाडसी चोरी


धरणगाव : शहरातील जैन गल्लीतील दुकानदाराकडे चोरट्यांनी धाडसी चोरी करीत सोन्याचे दागिने आणि 45 हजारांची रोकड मिळून एक लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा मंगळवार, 2 जुलै रोजी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीने खळबळ
किशोर गुलाबदास जैन (55, रा.जैन गल्ली, धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पूजा साहित्याचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 1 जुलै रोजी रात्री ते जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातच्या दुसर्‍या मजल्यावरील दरवाजातून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि 45 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

हा प्रकार मंगळवार, 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आला. याप्रकरणी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय जिभाऊ पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !