जळगाव जिल्ह्यातील दहा घरफोड्यांमधील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात : 70 ग्रॅम सोन्यासह शंभर ग्रॅम चांदी जप्त


फैजपूर : धाडसी घरफोडी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात फैजपूर, रावेर, यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयितांना मध्यप्रदेशात नेले. चोरुन नेलेले 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 100 ग्रॅम चांदी या संशयितांनी पथकाला काढुन दिली. राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रीतमीसिंग बरनाला (26), ईश्वरसिंग नुरबीनसिंग चावला (23, दोघे रा.उमर्टी, ता.वरला, म.प्र.)
अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे घरफोडी प्रकरण
फैजपूर पोलीस ठाण्यात 24 मे रोजी घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल होता. रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभाग अन्नपूर्णा सिंह यांनी घरफोडी गुन्हे उघड करण्याकामी सुचना केल्या होत्या. त्यानुसार सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, हवालदार रवींद्र मोरे, हवालदार अनिल पाटील, मोती पवार, विकास सोनवणे, भूषण ठाकरे, बाळू भोई, विशाल मोरे, दिनेश भोई, भूषण ठाकरे, मो.जुबेर शेख यांचे पथक गुन्हे तपास कामी शिरपूर येथे रवाना झाले. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात अटकेतील संशयितांचे वर्णन फैजपूर गुन्ह्यातील संशयितांप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. प्रभारी अधिकार्‍यांशी या सादर्भात संपर्क साधत पथकाने राजेंद्रसिंग उर्फ राजन बरनाला तसेच ईश्वरसिंग चावला या संशयितांना शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले.

सात गुन्ह्यांची उकल
संशयितांच्या अटकेदरम्यान चौकशी केली. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, पोकॉ विकार शेख, पोकॉ समाधान ठाकुर, वसीम अरमान तडवी आदींसह फैजपूर, रावेर तसेच यावल पोलिसांचे संयुक्त पथक संशयितांना सोबत घेत मध्यप्रदेशातील इंदोर येथे धडकले. संशयितांकडून फैजपूर पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे, रावेर पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे ,यावल पोलीस ठाणे 2 गुन्हे, अडावद पोलीस ठाणे 1 गुन्हा असे एकुण सात गुन्ह्यांची संशयितांनी कबुली दिली. या गुन्ह्यातील 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी असा 3 लाख 55 हजार रुपयांचे मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. या संशयितांनी जळगाव जिल्ह्यात एकूण दहा गुन्हे केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !