वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीत बोलावले : महाराष्ट्रातील प्रशिक्षण रद्द


Controversial IAS officer Pooja Khedkar summoned to Mussoorie : Maharashtra training cancelled पुणे : राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक-एक कारनामे समोर आल्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण संपवण्यात आले असून त्यांना तातडीने मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.

प्रशिक्षण केंद्रात हजर होण्याचे आदेश
खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलं. याच मुद्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या युपीएएसीमधील गैरप्रकार प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. आता असे समोर आले आहे की यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवण्यासाठी पूजानी त्यांचे नाव आणि वय बदलले होते. 2020 आणि 2023 साठी सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये त्यांनी दाखल केलेल्या दोन अर्जांमध्ये पूजा यांची वेगवेगळी नावे आहेत.


पूजा यांच्या प्रशिक्षणावर बंदी
पूजा खेडकर ( IAS officer Pooja Khedkar) यांचे प्रशिक्षण आठवडाभरासाठी बंद करण्यात आले आहे. पूजा अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात 15 ते 19 जुलै दरम्यान इंटर्न म्हणून रुजू होणार होत्या मात्र वाशिमच्या जिल्हा अधिकार्‍यांनी त्यास स्थगिती दिली आहे. पूजा यांच्या अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्राची पोलीस चौकशी होणार आहे. प्रमाणपत्र देणार्‍या डॉक्टरचीही चौकशी होईल.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !