श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी महोत्सवाला सुरुवात
मंत्री गिरीश महाजन पंढरपूरात वारी व्यवस्थापनाकरिता तळ ठोकून
फैजपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी महोत्सवाला सुरूवात झाली असून राज्य शासनाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन पंढरपूर येथे वारी व्यवस्थापणासाठी तळ ठोकून आहे. पंढरपूर येथील डिगंबर महाराज चिनावलकर मठास त्यांनी भेट दिली व यावल व रावेर तालुक्यातून आलेल्या वारकर्यांशी संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी वारी काळातील समस्यांबाबत माहिती दिली.
सभा मंडपासाठी निधी देण्याची ग्वाही
याप्रसंगी संस्थेच्या आवारात सभा मंडप उभारणे आवश्यक असून यासाठी निधीची मागणी केली असता मंत्री गिरीष महाजन यांनी या मठात तत्काळ मोठा सभामंडप उभारणीसाठी लागणारा सर्व निधी शासन देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व हभप रवींद्र महाराज हरणे, विशाल महाराज, दुर्गादास महाराज, भाऊराव महाराज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, घनश्याम पाटील, विठ्ठल भंगाळे, किशोर बोरोले, सुनील भंगाळे, अतुल तळेले आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार नरेंद्र नारखेडे यांनी केले. अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते.

