उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिकॉप्टर प्रवासात बचावले


गडचिरोली : नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले आहे. याबाबतचा किस्सा स्वतः अजित पवारांनी सभेत सांगितला. ते म्हणाले की, माझ्या तर पोटात गोळा उठला होता मात्र पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरलो.

पायलटने कौशल्य दाखवले
गडचिरोलीत या सर्व नेत्यांना खराब हवामानाचा फटका बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं सांगितलं जातं. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले.


अजितदादांनी स्पष्टच सांगितले सर्व काही….
अजित पवार या बाबत म्हणाले की, आम्ही येत होतो तेव्हा खूप ढग होते. नागपूरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो.. सर्व घाबरून होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही. आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो, असा किस्सा त्यांनी सांगितला अन् गडचिरोलीत सभेत एकच हशा पिकला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !