भुसावळात महिला दिन सप्ताहानिमित्त रॅलीचे आयोजन
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिवस सप्ताहानिमित्त ‘रन भुसावळ मंडळ’चे गुरूवारी आयोजन करण्यात आल. यात महिला कर्मचार्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या रनमध्ये महिला शक्ती, महिला सबलीकरण, महिलांच्या योगदानाबद्दल घोषणा देण्यात आल्या. बेटियों को पढना है, देश को आगे बढना है आदी घेषणा देण्यात आल्या. रॅलीला हिरवी झेंडी डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा, सीएमएस पी.के.सामंत राय, सीनी डीपीओ एन डी.गांगुर्डे तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रॅली ही डीआरएम कार्यालयापासून निघाल्यानंतर महात्मा गांधी पुतळा, शहर पोलीस स्टेशन, पाणी गेट मार्गेस्टेशन रोडने निघून रेल्वे व्हिआयपी सायडिंगला तिचा समारोप झाला. यावेळी डीआरएम गुप्ता यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सिनी डीपीओ एन.डी.गांगुर्डे यांनी केले.


