साकेगाव ग्रामपंचायतीची दोन कोटी 42 लाखांची थकबाकी माफ
आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा : उपमुख्यमंत्र्यांकडून दिलासा
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून साकेगाव ग्रामपंचायतीचीची तब्बल दोन कोटी 12 लाख 42 हजार 756 रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत जलविद्युत केंद्राची दंड व्याजासहित थकबाकी होती मात्र आता ही थकबाकी माफ झाी असून उर्वरित रकमेचे हप्ते पाडून देण्यात आले आहे. साकेगाव ग्रामपंचायतीला यापूर्वी दररोज 900 घन मिटर पाणीपुरवठा करण्यात येतो तो पाणीपुरवठा आता वाढीव कोटा दररोज 935 घनमिटर वाढीव आरक्षित करण्यात आला आहे.
आमदारांच्या पाठपुराव्याने थकबाकी माफ
साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे महाराष्ट्र औद्योगिक वसाहत जलविद्युत केंद्राची दंड व्याजासहित थकबाकी होती मात्र आमदारांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही थकबाकी माफ करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीने ग्रामपंचायतीला पाच वर्षाचे हप्ते प्रतिमहा 23 हजार 953 रुपये प्रमाणे पाडून दिले असून हे हप्ते नियमित भरण्याच्या अटी शर्तीवर दोन कोटी 12 लाख 42 हजार 756 रुपये रुपये माफ करण्यात आलेले आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत जलशुध्दीकरण केंद्राची थकीत पाणीपट्टी न भरल्याने महालक्ष्मी नगर व परिसरातील भागाला पाणीपुरवठा करता येणार आहे. या भागासाठी यापूर्वीच स्वतंत्र पाईप लाईन टाकून जलकुंभ उभारण्यात आले आहे. वाढीव कोटा मंजूर झाल्याने आता थेट पाणीपुरवठा होण्याची प्रतीक्षा आहे.





