सुनसगाव रस्त्यावरील फर्निचर कंपनीतून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला
भामट्यांनी कर्मचार्यांना बांधत केली चोरी : पोलिसांकडून कसून तपास
भुसावळ : नशिराबाद गावाजवळील सुनसगाव रस्त्यावरील जय हिंद फर्निचर कंपनीत मध्यरात्री दोन कर्मचार्यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशीन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह आदी साहित्य मिळून चार लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला. जबरी चोरीची घटना शनिवार, 20 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 8 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मध्यरात्री जबरी चोरी
नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यावर मनोज पंढरीनाथ पाटील (45, मोहाडी रोड, जळगाव) यांचे जय हिंद फर्निचर दुकान आहे. शनिवार, 20 जुलै रोजी मध्यरात्री त्यांचे दुकानातील कर्मचारी जितेंद्र कुमार राम नरेश कुमार (28) आणि पिंटू कुमार शिवचंद्रराम (26, दोन्ही रा.उत्तरप्रदेश) हे दोघेजण दुकानाच्या आत झोपलेले असतांना अज्ञात चार ते पाच जण घेवून दुकानात शिरले. कर्मचार्यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह 4 लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेला.

हा प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक मनोज पाटील यांनी नशिराबाद पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री 8 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहे.
