पाचोरा तालुक्यात कौटूंबिक वादातून पतीचा खून : पतीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात
पाचोरा : कौटूंबिक वादातून पत्नीसह अल्पवयीन मुलाने पित्याचा खून केला. ही घटना पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे घडली. विकास शंकर पाटील (37) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे तर पोलिसांनी सोनाबाई पाटील यांच्यासह त्यांच्या लहान मुलास ताब्यात घेतले आहे.
कौटूंबिक वादातून घअना

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील विकास पाटील हा कुटूंबाशी कौटुंबिक वाद करीत होता. त्यातच रविवार, 21 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्याचे पत्नी व अल्पवयीन मुलाशी भांडण झाले. या भांडणात मुलाने पित्याच्या कंबरेवर, पाठीवर व मानेवर मारहाण केली तसेच पत्नीने विटेने मारहाण केल्याने तो जखमी झाला. घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजारी असलेले नातेवाईकांनी धाव घेतली.
ग्रामस्थांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात विकास यास दाखल केले असता डॉक्टरांनी जळगाव येथे हलविण्यास सांगितले.
नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात पत्नी व अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत.
