डॉ.नरेंद दाभोळकर हत्या : अरबी समुद्रात पिस्तूल सापडले


मुंबई : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येत वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून जप्त करण्यात सीबीआयला यश आले आहे. पिस्तुलाची सध्या तपासणी केली जात आहे. यानंतरच आरोपींनी हे पिस्तूल वापरले होते की नाही हे स्पष्ट होणार आहे. आरोपींनी हत्येनंतर खारेगाव खाडीजवळ पिस्तूल फेकले होते. त्याच भागात ते सापडले. साडेसात कोटी रुपये खर्च केल्यानंतर नॉर्वेहून यंत्रे मागवून हे पिस्तूल शोधण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !