जळगावात पुन्हा अपघात : ट्रकने उडवल्याने दुचाकीस्वार ठार


जळगाव : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला. अपघाताची घटना गुरुवार, 25 जुलै रोजी आकाशवाणी चौकात घडली. शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (69, रा.अक्सा नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

अपघाताची मालिका कायम
शेख रऊफ हे महाबळकडून दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.डी.2751) ने जात असताना आकाशवाणी चौकात पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आर.जे.11 जी.बी.7642) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता घडला. नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मयत शेख यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं असा परिवार आहे.

अपघातानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. आकाशवाणी चौकात प्रचंड खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.

 


कॉपी करू नका.