तलवार बाळगून दहशत : संशयीत नशिराबाद पोलिसांच्या जाळ्यात


नशिराबाद : नशिराबाद शहरातील पिंजारी हॉलजवळतलवार घेवून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या आरोपीला नशिराबाद पोलिसांनी शनिवार, 27 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता अटक केली. अत्ता उल्लाह अमान उल्लाह शाह (वय 29 रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

तलवारी बाळगून दहशत भोवली
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पिंजारी हॉल परिसरात उत्ता उल्लाह अमान उल्लाह शहा हा तरूण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवार, 27 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत संशयित आरोपी अत्ता उल्लाह अमान उल्लाह शाह (29, रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल तौसीफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश वराडे हे करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहा.निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश घायतड, हवालदार युनूस शेख, कॉन्स्टेबल सागर बीडे, कॉन्स्टेबल रूपेश साळवे, कॉन्स्टेबल तौसीफ पठाण आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !