ठेवींच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे लवकरच धोरण जाहीर होणार


सहकार राज्यमंत्री डॉ.कदम यांचे जनसंग्राम संघटनेला आश्वासन

खिर्डी : जिल्ह्यासह राज्यातील सर्वच पतसंस्थांच्या ठेवीदारांना न्याय देण्याच्या भूमिकेतून ठेवींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. ठेवीदारांना लवकरच दिलासा दिला जाईल,अ से आश्वासन राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी जनसंग्राम ठेवीदार संघटनेला दिले. जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणित महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे प्रांताध्यक्ष व येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भालेराव यांच्यासमवेत मंत्री डॉ.कदम यांची मुंबई येथे नुकतीच विधानभवनात भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पात ठेवीदारांसाठी कर्जरूपी अर्थसहाय्य म्हणून 200 कोटी रुपयांचे पॅकेजची तरतूद करावी व यासाठी सहकार विभागाने शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची मागणी केली.

सरकार सकारात्मक
महाविकास आघाडी सरकार पतसंस्थामध्ये अडकून पडलेल्या ठेवी परताव्यासाठी कर्जरूपी अर्थसहाय्य देण्यावर सकारात्मक असून याबाबत सहकार खात्याकडून धोरण ठरविण्यासाठी जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या प्रतिनिधी समवेत सहकार खात्याची आठवडाभरात आढावा बैठक लावण्याच्या सूचना डॉ.विश्वजीत कदम यांनी दिल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !