मध्य प्रदेशातील दुचाकी चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


सात दुचाकी जप्त : चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्‍या तिघांविरुद्धही गुन्हा

जळगाव : मध्यप्रदेशातील अट्टल दुचाकी चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख 90 हजार रुपये किंमतीच्या चोरलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण तुकाराम बारेला (25, दुधखेडा, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे असून त्याचा साथीदार नाना रायसिंग वासकले (22, जामठी, ता.वरला) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल असून आरोपीकडून चोरीच्या दुचाकी करणार्‍या अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीची दुचाकी खरेदी करणारेही आरोपी
आरोपी किरण बारेला याने जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून सात दुचाकींची चोरी करीत त्यांची कमी भावात विक्री केली होती. चोरीची दुचाकी घेणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मनोज उर्फ मुन्ना कालम वंजारी (राठोड) (गंगानगर, बलवाडी, ता.वरला), गुनीलाल भल्या पावरा (30, मेलाने, ता.चोपडा) व सुभाष पावरा (30, घेगाव, ता.वरला) यांचा समावेश असून त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
आरोपी किरण बारेला याच्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, महेश महाजन, महेश पाटील, प्रवीण हिवराळे, दीपक शिंदे, अरुण राजपूत, परेश महाजन आदींनी मुसक्या आवळल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !