बहिणाबाईंची कविता जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारे विद्यापीठ : प्राचार्य किशोर कोल्हे


भालोद (31 ऑग्स्ट 2024) : निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या मानवतेच्या विचारांच्या पुरस्कर्त्या होत्या. जीवन अनुभवातून फुललेली त्यांची कविता मानवी जीवन सुंदर करणारे विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी केले. ते कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आठवणी बहिणाबाईंच्या’ कार्यक्रमात बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास मराठी विभाग प्रमुख व बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अध्ययन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.जतीन मेढे, सहाय्यक संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.आशुतोष वर्डीकर, प्रा.कोमल सावळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ.दिनेश पाटील यांनी तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा.भावना प्रजापती यांनी मरनले. कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !