भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे उद्या शिक्षकांचा सन्मान
शहर व तालुक्यातील शिक्षकांना उपस्थिती देण्याचे आवाहन
Teachers will be honored tomorrow by Pratishtha Mahila Mandal in Bhusawal भुसावळ (12 सप्टेंबर 2024) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात शुक्रवार, 12 रोजी सायंकाळी पाच वाजता शहर व तालुक्यातील शिक्षकांचा सहृदय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक केवळ मार्गदर्शक नसून आपल्या जीवनातील प्रेरणास्त्रोत आहेत शिवाय ते शाळेत पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित ज्ञान न देता जीवनातील शहाणपण, नैतिकता आणि आदर्श शिकवत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत शिक्षक दिनाच्या औचित्याने या उपक्रमाचे आयोजन आमदार संजय सावकारे यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
शिक्षक गौरव सोहळ्याप्रसंगी भुसावळचे आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी जितेंद्र फातले, शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी शहरासह तालुक्यातील पाचशेवर शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील शिक्षकांनी तसेच पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

