रावेर पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट परिसर सुविधांपासून वंचित

रावेर नगरपालिका प्रशासनाकडे सुविधा पुरवण्याची नागरिकांची मागणी


रावेर (13 सप्टेंबर 2024) : रावेर पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या छोरीया मार्केटमागील परिसरातील रस्ते, गटारी, विजेचे खांब या संदर्भातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रावेर नगरपालिकेकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. कार्यालयीन अधीक्षक सर्फराज तडवी यांना निवेदन देण्यात आले.

कर वसुली वेळेवर मात्र सुविधांची बोंब
दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीत समावेश करून नागरिकांकडून कर वसुल केला जात आहे मात्र पालिकेमार्फत मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने पोलीस लाईन, छोरिया मार्केट मागील परिसरातील नागरिकांनी पालिकेला निवेदन दिले. त्यात गटारी, रस्ते, पूर्णतः विजेचे खांब नाही तसेच रस्त्यांची दयनीय झाल्याने नुसतेच खड्डेच पडल्याचे त्यात नमूद आहे. पावसाच्या पाण्याचे डबके जागोजागी साचल्याने यातून वाहन नेण्याची समस्या निर्माण होत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. त्यातच पावसाचे पाणीही तुंबत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे झाला आहे.


रस्ते अंधारात : अप्रिय घटनेची भीती
पुरेसे विजेचे खांब उपलब्ध करुन दिले नसल्याने परिसरातील रस्ते अंधारात येतात. शिवाय मोकाट कुत्र्यांचा त्रासही वाढला आहे. साप, विंचू व अन्य प्राणी देखील या परिसरात वावरत असल्यामुळे येथील नागरिकांना त्याचाही धोका आहे. या परिस्थितीमुळे भयभीत झालेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी मूलभूत सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनातून दिला आहे .

यांनी दिले निवेदन
नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सर्फराज तडवी यांना निवेदन दिले. यावेळी प्रणित महाजन यांच्यासह अशोक पाटील, राहुल चौधरी, देवेन शाह, संजय आमोदे, राहुल महाजन, दीपक राणे, पवन बोदडे, आकाश पाटील आदी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !