नवयुवक गणेश मंडळाच्या अभिनव उपक्रमांचा आदर्श कार्य अन्य मंडळानी घ्यावा : पत्रकार संजय सराफ


फैजपूर (13 सप्टेंबर 2024) : नवयुवक गणेश मंडळाच्या अभिनव उपक्रमांचा आदर्श कार्य अन्य मंडळानी घ्यावा, असे आवाहन पत्रकार संजय सराफ यांनी येथे केले.

शहरातील मंडळांना भेटी
रामराज्य सेवाभाव संस्थेच्या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत या मुख्य उद्देशाने फैजपूर सार्वजनिक उत्सव समिती अंतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम राबवला जात असून त्या अंतर्गत मंडळांना पुरसकर दिले जाणार आहे. या अनुषंगाने संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील विविध मंडळांना भेटी दिल्या. सतपंथी वॉर्डमधील नवयुवक गणेश मंडळाने महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या संकल्पनेतून रामराज्य सेवाभावी संस्थेच्या ‘एक दुर्वा समर्पणाची’ या सार्वजनिक शहर उपक्रमास प्रतिसाद देत गावाची साफसफाई करणार्‍या वाल्मिकी समाज, दिव्यांग, चर्मकार, धर्म बंधू यांना बाप्पांच्या आरतीचा मान देत सनातन सकल हिंदू समाज सलोखा बंधू-भाव आदर्श जपण्याचे अद्वितीय कार्य केल्याने हा आदर्श अन्य गणेश मंडळानी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामराज्य सेवाभावी संघचे संजय सराफ यांनी यावेळी केले.


पारंपरिक पद्धतीनुसार निघणार मिरवणूक
दरम्यान, विसर्जन मिरवणूक सुद्धा पारंपरिक पद्धतीनुसार फुलंब्री येथील टाळकरी भजन मंडळींच्या गजरात काढणार असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष कृणाल कोल्हे यांनी दिली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्यासोबत रामराज्य संघाची संकल्पना, बाबींबाबत संवाद साधून आशीर्वाद घेण्यात आले. महाराजांनी रामराज्य सांची संकल्पना, कार्य अभिनंदनीय व काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराजांसोबत रामराज्यचे संजय सराफ, अतुल महाजन, राजाभाऊ चौधरी, निलेश चौधरी, मृणालिनी राणे, अनुराधा परदेशी, हेमांगी चौधरी, मंडळाध्यक्ष कृणाल कोल्हे, सार्वजनिक उत्सव समिती सदस्य गायत्री भंगाळे, उल्हास वाघूळदे, कांतीलाल चौधरी आदींची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !